चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो श्रीहरीकोटा इथून दिशादर्शक मालिकेतील शेवटचा उपग्रह IRNSS -1G हा प्रक्षेपित करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PSLV-C33 या अत्यंत  भरवशाच्या प्रक्षेपकाद्वारे दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी स्वदेशी GPS प्रणालीतील सातवा आणि अंतिम उपग्रह अवकाशात झेपावेल. नियोजित कक्षेत पोहचल्यावर काही मिनिटांनी हा उपग्रह पूर्णपणे कार्यान्वित केला जाईल.


यामुळं भारतीय उपखंडात GPS सदृश्य आणि भारतीय प्रणाली असलेले तंत्र पूर्णपणे कार्यन्वित होईल. आपण सध्या मोबाईल, वाहनांमध्ये किंवा इतर वापरांत GPS तंत्राचा आधार घेतो त्याऐवजी हे भारतीय तंत्रज्ञान वापरता येणे शक्य होणार आहे. यामुळे एखाद्याचे अचूक ठिकाण, दिशा, वेग याचीही माहिती मिळणार आहे.


या प्रणालीमुळे भारतीय उपखंडात म्हणजेच देशाच्या सीमेपासून 1500 किमी अंतरापर्यंत अचूक दिशादर्शन होऊ शकणार आहे. अर्थात संरक्षण आणि वैज्ञानिक स्तरावर याचा जास्त वापर होणार आहे. ही मोहिम यशस्वी ठरल्यास स्वदेशी दिशादर्शक प्रणाली असलेला अमेरिका, रशिया, युरोपियन अवकाश संस्था आणि चीननंतरचा भारता पाचवा देश ठरणार आहे.