नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारताने दोन दिवसात तीन वेळा मिसाईल परीक्षण केलं आहे. पाकिस्तानला भारताने इशारा दिला आहे की, जर पाकिस्तान त्यांच्या कारवाया सुरुच ठेवेल तर मग त्यांना जगाच्या नकाशातून गायब करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. पाकिस्तान देखील भारताच्या या परीक्षणानंतर धास्तावला आहे.
भारताने ही मिसाईल इस्राईलसोबत एकत्र मिळून बनवली आहे. लांब आणि जवळ अशा दोन्ही ठिकाणांवर मारा करण्याची यामध्ये क्षमता आहे ज्याचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं.


संरक्षण क्षमता वाढवत भारताने उडिसाच्या सीमेवर मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं. एका मोबाईल लॉन्चरच्या माध्यमातून भारत आणि इस्राईलने संयुक्तपण या मिसाईलचं परीक्षण केलं. यामुळे हवेत मारा करण्याच्या भारताच्या संरक्षण क्षमतेमध्ये आणखी वाढ झाली आहे. ज्यामुळे भारताची ताकत आणखी वाढली आहे.