नवी दिल्ली : भारत पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. स्वीडनच्या स्टॉकहोमस्थित थिंक टँकने ही माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील जितकी शस्त्रास्रांची आयात केली जाते त्यातील १४ टक्के आयात एकटा भारत देश करतो. पहिल्या १० देशांच्या यादीत सहा आशियाई देश आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. चीनचे आयातीचे प्रमाण ४.७ टक्के आहे. ऑस्ट्रेलिया(३.६ टक्के) आणि पाकिस्तान (३.३ टक्के) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. 


भारत पहिल्या क्रमांकावर असला तरी ही अभिमानास्पद बाब म्हणता येणार नाही. लष्करी सामुग्रीच्या स्वदेशी उत्पादनात सततच्या अपयशामुळे भारताला मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री आयात करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून भारताने सर्वात जास्त आयात केली आहे. आता मात्र या व्यवहारात अमेरिकेचा हिस्सा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. २००६-१० च्या आयातीच्या प्रमाणात २०११-१५ सालांत केलेल्या आयातीत तब्बल ९० टक्के वाढ झाली आहे.