नवी दिल्ली : 'अग्नी -5' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चौथी आणि अंतिम चाचणी डीआरडीओ घेणार आहे. अग्नी 5 या क्षेपणास्त्राचं वजन 50 टन असून 5000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची मारक क्षमता क्षेपणास्त्रात आहे. ओरिसाच्या व्हीलर बेटांवरून 'अग्नी 5' ची चाचणी पूर्ण क्षमतेने घेतली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ही सलग चौथी चाचणी यशस्वी झाली तर 'अग्नी 5' हे स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडकडे पुढील चाचण्यांकरता सुपूर्द करण्यात येईल. एसएफसी हे देशातील अणुशस्त्र वाहून नेणा-या यंत्रणेवर नियंत्रण ठेवते. एसएफसी हे लष्कराच्या अतिवरिष्ठ अधिका-यांच्या नियंत्रणात आहे. 


चाचणी जर यशस्वी झाली तर एसएफसी 'अग्नी 5' च्या आणखी दोन चाचण्या घेईल आणि मगच अग्नी 5 युद्धभुमीवर काम करण्यासाठी सज्ज झालेले असेल.
'अग्नी - 5' ची चाचणी यशस्वी झाल्यास आंतरखंडीय क्षेपणास्त्र 
बाळगणा-या रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इंग्लड हातावर मोजण्या इतक्या देशांच्या रांगेत भारत जाऊन बसेल.


चीनचे आव्हान लक्षात घेऊनच 'अग्नी 5' हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलंय. 'अग्नी 5' मुळे जवळपास संपूर्ण चीन हा हल्ल्याच्या टप्प्यामध्ये येणार आहे.