नवी दिल्ली : भारत संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या विश्वातील 5 मुख्य देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. भारताचा संरक्षण बजेट 50.7 अरब डॉलर आहे. संरक्षणावर खर्च करण्याच्या बाबतीत भारताने सउदी अरब आणि रशियाला देखील मागे टाकलं आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2016 जेन्स डिफेंस बजट्स रिपोर्टनुसार अमेरिका, चीन आणि ब्रिटेन संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे जगातील पहिले 3 देश आहेत. त्यानंतर भारताचा चौथा नंबर लागते. 

सऊदी अरब आणि रशिया यांचा यादीत भारतानंतर क्रमांक लागतो. भारताने या वर्षी संरक्षणासाठी 50.7 अरब डॉलर खर्च केले जे मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील वर्षी 46.6 अरब डॉलर खर्च केले होते.

भारत 2018 पर्यंत ब्रिटेनला देखील मागे टाकेल हे निश्चित आहे. अमेरिकेने या वर्षी 622 अरब डॉलर संरक्षावर खर्च केले आहेत. चीनने 191.7 अरब डॉलर तर ब्रिटेनने 53.8 अरब डॉलर खर्च केले आहेत. सउदी अरबचं संरक्षण बजेट 48.68 अरब डॉलर तर रशियाचं संरक्षण बजेट 48.44 अरब डॉलर आहे.ॉ

नवी दिल्ली : भारत संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या विश्वातील 5 मुख्य देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. भारताचा संरक्षण बजेट 50.7 अरब डॉलर आहे. संरक्षणावर खर्च करण्याच्या बाबतीत भारताने सउदी अरब आणि रशियाला देखील मागे टाकलं आहे. 

2016 जेन्स डिफेंस बजट्स रिपोर्टनुसार अमेरिका, चीन आणि ब्रिटेन संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे जगातील पहिले 3 देश आहेत. त्यानंतर भारताचा चौथा नंबर लागते. 

सऊदी अरब आणि रशिया यांचा यादीत भारतानंतर क्रमांक लागतो. भारताने या वर्षी संरक्षणासाठी 50.7 अरब डॉलर खर्च केले जे मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील वर्षी 46.6 अरब डॉलर खर्च केले होते.

भारत 2018 पर्यंत ब्रिटेनला देखील मागे टाकेल हे निश्चित आहे. अमेरिकेने या वर्षी 622 अरब डॉलर संरक्षावर खर्च केले आहेत. चीनने 191.7 अरब डॉलर तर ब्रिटेनने 53.8 अरब डॉलर खर्च केले आहेत. सउदी अरबचं संरक्षण बजेट 48.68 अरब डॉलर तर रशियाचं संरक्षण बजेट 48.44 अरब डॉलर आहे.