बोफोर्सनंतर आता पुन्हा भारत तोफ खरेदी करणार
नवी दिल्ली : भारताच्या तोफखान्यात आता एम 777 जातीच्या तोफा सामील होणार आहेत. भारताने अमेरिकेकडून अत्याधुनिक एम 777 या 145 तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय.
विशेष म्हणजे बोफोर्स घोटाळ्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात तोफांची खरेदी करण्यात येत आहे. मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.
145 तोफांसाठी भारताला 5000 कोटी रूपये खर्च येणार आहे. पुढल्या काही दिवसांत याबाबत करार करण्यात येईल. पहिल्या 20 तोफा थेट भारताला मिळतील, उर्वरीत तोफा भारतात बनवल्या जातील.
करार झाल्यावर पहिल्या सहा महिन्यात दोन तोफा दाखल होतील. त्यानंतर दहा महिन्यांनंतर दर महिन्याला दोन तोफा लष्कराला मिळतील.
या तोफेचं वैशिष्ट्य काय आहे पाहूया
तब्बल 30 वर्षाच्या खंडानंतर ( बोफोर्स घोटाळ्यानंतर ) भारत नवीन तोफा विकत घेणार,
मंत्रीमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितिमध्ये निर्णय
एकूण 145 , M777 जातीच्या तोफा अमेरिकेकडून 737 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 5000 कोटी रूपयांना विकत घेणार
पुढील काही दिवसांत करार केला जाणार
पहिल्या सुमारे 20 तोफा थेट दिल्या जाणार त्यानंतर उर्वरित तोफा भारतात बनवल्या जाणार
करार झाल्यावर पहिल्या सहा महिन्यांत दोन तोफा त्यांनंतर दहा महिन्यानंतर दर महिन्याला दोन तोफा लष्कराला मिळणार
M777 हा अत्याधुनिक आहेतच पण वजनाने अत्यंत हलक्या म्हणजे सुमारे 4.2 टन वजनाच्या आहेत
सुमारे 25 किमीपर्यन्त अचूक मारा करण्याची क्षमता
वजनाने हलक्या आल्याने सहज वाहून नेणे शक्य, विशेषतः डोंगराळ भागांत, चीनच्या सीमेवर ( भारताच्या ईशान्य ) भागांत mountain strike corps बरोबर तैनात केल्या जाणार