भारताचा सिंधूचं पाणी रोखून धरण्याचा पाकिस्तानला इशारा
उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर हल्ला झाल्यानंतर भारताने सगळ्या बाजूने पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तान पुन्हा एकदा इशारा देत पाकिस्तानला संकटात आणलं आहे. गरज पडल्यास भारत हा सिंधू नदीचं पाणी अडवून धरु शकतो असा इशारा पाकिस्तानला देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर हल्ला झाल्यानंतर भारताने सगळ्या बाजूने पाकिस्तानला घेरण्यास सुरुवात केली आहे. भारताने पाकिस्तान पुन्हा एकदा इशारा देत पाकिस्तानला संकटात आणलं आहे. गरज पडल्यास भारत हा सिंधू नदीचं पाणी अडवून धरु शकतो असा इशारा पाकिस्तानला देण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, काय भारत 1960 मध्ये पाकिस्तानसोबत झालेला 'पाणी संधी' करार तोडू शकतो ? तर त्यावर त्यांनी म्हटलं की, सहयोग हा एकमेकांच्या विश्वासावर आधारीत असतो.' त्यामुळे हा करार एकमेकांवर विश्वास नसल्यास मोडला जाऊ शकतो.
काय आहे सिंधू जल करार
1960 मध्ये सिंधू जल कराराने पाकिस्तानसाठी 3 मोठ्या नद्या सुरक्षित केल्या आहेत. सिंधु नदीचं जवळपास 80 टक्के पाणी हे पाकिस्तानच्या वाट्याला जातं. तर फक्त 19.48 टक्के पाणी हे भारताला मिळतं. हा असा करार असतो ज्यामुळे ज्या देशातून नदी उगम पावते त्या देशाने ज्या देशामध्ये ही नदी वाहत जाते त्या देशाला देखील पाणी मिळावं म्हणून त्यांचा पाण्यावरील हक्क त्याग करण्यास सांगतो. चीनने त्यांच्या देशातील प्रत्येक नदीवर त्यांचा हक्क असल्याचं म्हटलं आहे. पाण्यामुळे जर इतर भागावर काही परिणाम होत असेल तर त्यामुळे आम्हाला काही फरक नाही पडत असं देखील चीनने म्हटलं आहे त्यामुळे चीनने कोणत्याही देशांसोबत त्यांच्या देशातून वाहणाऱ्या नद्यांच्या बाबतीत आजुबाजुच्या 13 देशांपैकी कोणासोबतही करार नाही केला आहे. गरज पडल्यास चीन हा दुसऱ्या देशात जाणारं पाणी रोखूनही धरु शकतो.