दहशतवादी अब्दुल अजीजने मान्य केले भारतात मुस्लिमांची स्थिती चांगली
साऊदी अरबच्या जेलमध्ये १० वर्ष शिक्षा भोगून आलेला जेहादी अब्दुल अजीज उर्फ गिद्दाह याने मान्य केले की भारतात मुसलमानांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करण्याची गरज नाही, असेही त्याने सुचवले होते.
नवी दिल्ली : साऊदी अरबच्या जेलमध्ये १० वर्ष शिक्षा भोगून आलेला जेहादी अब्दुल अजीज उर्फ गिद्दाह याने मान्य केले की भारतात मुसलमानांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करण्याची गरज नाही, असेही त्याने सुचवले होते.
अब्दुल अजीज हा एक दशकापूर्वी आंध्रप्रदेशात झालेल्या हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोपी आहे. साऊदी अरबमध्ये १० वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर त्याला आता भारतात पाठविण्यात आले आहे. तो देशातील पूर्व भागातील तेल ठिकाणांना उडविण्याच्या आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.
का अटक केली होती त्याला
अब्दुलला २००५ मध्ये साऊदी अरबमध्ये अटक करण्यात आली होती. तो इराकमधून जेद्दाह येथे जाऊन अमेरिकेशी लढण्याची योजना बनवत होता. तो जुलै २००५ मध्ये गल्फ एअरवेजच्या फ्लाइटने ढाक्याहून जेद्दाह गेला होता.
तिथे जाऊन तो पाकिस्तानी शकीलच्या घरी थांबला होता. तो बोस्निया आणि चेचेन्याच्या सीमावर्ती भागात लढण्यासाठी जात होता.
कोणी दिले होते आदेश
त्यावेळी साऊदी अरबच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अटक केले. त्याला १० वर्षांची शिक्षा झाली.अजीजच्या मते भारतापेक्षा बोस्निया आणि चेचेन्या येथे जिहाद आवश्यक होता. १९९७ मध्ये अजीजला त्याचे हँडलर मोहम्मद इस्माइल आणि पाकिस्तानी लष्कर ए तोयबाचा ऑपरेटीव्ह सलीमम जुनैद भारतमध्ये जिहाद करण्यासाठी तयार करत होते.
भारतावर हल्ला करण्यास नंतर तयार
त्यावेळी अजीजने सांगितले भारतात हल्ला करण्याची गरज नाही. इतर देशांच्या मानाने भारतात मुस्लिमांची स्थिती चांगली आहे. पण एक मोठी रक्कम मिळाल्यावर अजीज बाबरी मशिद उद्धवस्त केल्याच्या विरोधात युद्ध करण्यास तयार झाला होता.
शेखने अजीजला ९.५ लाख रुपये पाठविले होते.