नवी दिल्ली : स्‍विस बँकेत असलेले भारतीयांचा काळा पैसा कमी झाल्याची बातमी आहे. जवळपास बँकेतील २५ टक्के रक्कम कमी झाली आहे. बँकेत सध्या 8392 कोटी रुपये शिल्लक आहेत. स्‍विस नॅशनल बँकेने दिलेल्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1997 पासून स्‍विस बँकेत पैसे ठेवण्यास भारताला परवानगी मिळाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी घट आहे. 2006 मध्ये ठेवीचा आकडा 23000 कोटी होता. 2011 आणि 2013 हे वर्ष सोडलं तर यानंतर बँकेतील ठेवी कमी होतांना दिसत आहे. 


स्‍वीत्झर्लंडने भारताला काळापैसा स्विस बँकेत ठेवणाऱ्याची माहिती देणार असल्याचा विश्वास दाखवला होता. 2018 मध्ये दोन्ही देशांमध्ये ऑटोमॅटिक एक्सचेंज प्रणाली स्‍थापिन होणार आहे यामुळे काळापैसा ठेवणाऱ्याची माहिती मिळणं सोपं होणार आहे. लवकरच एक टीम एक टीम स्‍विस बँकेचा दौरा करणार आहे कारण काळापैसा ठेवणाऱ्याची माहिती मिळू शकेल.