मुंबई : सोमवारी 'वर्ल्ड वायफाय डे होता. गुगल इंडियाने यादिवशी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. भारतातील १९  स्थानकांवरील वायफायचा १५ लाख भारतीय फायदा घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल इंडियाने त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, आम्ही या वर्षी फक्त २० टक्के सेवा देऊ शकलो. पण याला मिळलेला प्रतिसाद चांगला होता.


जानेवारी २०१६ मध्ये मुंबई सेंट्रल भारतात पहिला रेल्वे स्टेशन बनला होता. जेथे गुगलने फ्री वायफाय सर्विस दिली होती. तेव्हपापासून या ६ महिन्यात गूगलने इतर १८ स्थानकांवर वायफाय सुविधा सुरु केली.


मागील आठवड्यात गुगलने भारताच्या ४ मोठ्या स्थानकांवर म्हणजेच सियालदाह, लखनऊ जंक्शन, लखनऊ आणि गोरखपूर जंक्शनवर वायफाय सर्विस दिली. भारतातील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचा गुगलचा मानस आहे. सरकार देखील यासाठी त्यांना मदत करणार आहे.


वायफायचा वापर कशासाठी केला जातोय :


१. मुंबई सेंट्रल स्टेशनवरील वायफायवर एका आठवड्यात १ लाख यूजर्स कनेक्ट झाले.
२. एका दिवसात भुवनेश्वरने वायफाय वापराच्या बाबतीत मुंबई सेंट्रलला मागे टाकलं आहे.
३. पटना, जयपूर, विशाखापट्टनम या स्थानकावर डेटा मोठ्या प्रमाणात वापरला गेला.
४. जॉब्सचा शोध घेण्यासाठी आणि जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी वायफायचा अधिक वापर केला.
५. भुवनेश्वर आणि पुणे या दोन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत. या स्थानकावर एजुकेशनल कोर्सेस, परीक्षेचा निकाल, सॉफ्टवेयर डाउनलोडिंग आणि अॅप अपग्रेड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वायफायचा वापर केला गेला.