तीन दिवसांतच भारतातलं पहिलं अंडरवॉटर रेस्टॉरन्ट झालं बंद
गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठ्ठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं देशातलं पहिलं `अंडर वॉटर रेस्टॉरन्ट` अर्थात पाण्याखालचं रेस्टॉरन्स सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच बंद करण्यात आलंय.
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठ्ठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेलं देशातलं पहिलं 'अंडर वॉटर रेस्टॉरन्ट' अर्थात पाण्याखालचं रेस्टॉरन्स सुरू झाल्यानंतर केवळ तीन दिवसांतच बंद करण्यात आलंय.
अंडरवॉटर रेस्टॉरन्ट बनवणाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलंय. कारण, सुरु झाल्यानंतर या तिसऱ्याच दिवशी रेस्टॉरंटच्या सीलिंगमधून पाणी लिक होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर कॉर्पोरेशननं हे रेस्टॉरन्ट काही दिवस बंद करून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतलाय.
अंडरवॉटर रेस्टॉरंटची आणखी काही वैशिष्ट्ये...
सरदार पटेल रिंग रोडवर सनिसिटीजवळ हे रेस्टॉरंट बनवण्यात आलंय.
जमिनीच्या खाली वीस फुटांवर हे रेस्टॉरंट आहे.
९०० स्केअर फूटमध्ये बनवण्यात आलेल्या या रेस्टॉरन्टसाठी जवळपास ३ करोडोंचा खर्च आलाय.
या रेस्टॉरंटसाठी एक लाख ६० हजार लीटर पाण्याचा वापर करण्यात आलाय.
एखाद्या ऍक्वेरियमसारखाच त्याचा लूक आहे.
रेस्टॉरंटमध्ये खाता खाता वेगवेगळ्या प्रकारचे मासेही इथं पर्यटकांना पाहता येतील.
या रेस्टॉरंटमध्ये ऑनलाईन बुकिंगची सुविधा आहे.
यासोबतत तुम्ही येथे पंजाबी, थाय, मेक्सिकन आणि चायनीज जेवणाचा आनंद घेऊ शकता.