नवी दिल्ली : भारतीय जवानांनी जिवाची बाजी लावत LOCमध्ये घसून पाकिस्तानच्या आर्शीवादाने दहशतवादी कारवाया होत होत्या. ज्या तळावरून हे सर्व चालत होते. त्यापैकी 7 तळ भारताने सर्जिकल ऑपरेशन करुन उद्धस्त केले आणि उरी हल्ल्याचा भारताने योग्य बदला घेतला. यासाठी भारतीय लष्कराने रात्रीचीच वेळ निवडली होती. रात्री 12.30 ते पहाटे 4.40 या वेळेत 30 ते 35 दहशतवाद्यांचा खात्मा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्जिकल ऑपरेशनसाठी रात्री 12 ते 4 अशी वेळ निवडण्यात आली. कारण रात्रीच्या काळोखात शत्रुला आपली ओळख होऊ नये तसेच आपली ओळख लपविण्यासाठी सोपे होते. यासाठी सर्जिकल ऑपरेशन हे रात्रीच केले जाते.


सर्जिकल ऑपरेशनच्यावेळी लष्कर रात्रंच का निवडते? या पाठिमागे कारण असते, रात्रीच्यावेळी काळोखात ऑपरेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा बाधा येण्याचा संभव कमी असतो. त्यामुळे रात्रीच सर्जिकल ऑपरेशन यशस्वी होते. लष्कर आणि सर्व सामान्य जनतेच्या सुरक्षतेसाठी हे प्रमुख कारण या कारवाईमागे असते.


अमेरिकेने 2011मध्ये पाकिस्तानात एेबटाबाद येथे कुप्रसिद्ध दहशतवादी आणि अल कायदाचा प्रमुख ओसामा  बिन लादेन याला पकडण्यासाठी तो राहत असलेल्या ठिकाणी रात्रीच सर्च ऑपरेशन केले. कारण शत्रूला आपली ओळख होऊ नये, हा हेतू होता.


सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?


 
- कोणत्याही प्रतिबंधीत क्षेत्रात लष्कर शत्रूला किंवा दहशतवाद्यांना नुकसान पोहचविण्यासाठी त्यांना ठार करण्यासाठी सैनिकी कारवाई करते त्याला सर्जिकल स्ट्राइक म्हटले जाते. 


- ज्या ठिकाणी कारवाई केली जाते. त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती गोळा केली जाते. 
 
- त्यानंतर कारवाईची वेळ ठरवली जाते. 


- या कारवाईची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते. याची सूचना काही ठरावीक लोकांनाच असते. 


- सर्जिकल स्ट्राइकमध्ये ज्या ठिकाणी हल्ला करायचा असतो, नेमकं त्यालाच लक्ष्य केले पाहिजे. त्यामुळे केवळ दहशतवादी ठार होतील इतर नागरिकांना काहीही नुकसान होणार नाही. 


- भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत केवळ दहशतवाद्यांनाच ठार मारण्यात आले. 


- भारताच्या स्पेशल कमांडो पथकाने या सर्जिकल स्ट्राइकला मूर्तरूप दिले आहे. 


- गेल्या वर्षी जूनमध्ये भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करात सामील होऊल पूर्वोत्तरमधीळ काही दहशतवाद्यांना ठार केले होते.