कानपूर : इंदूर-पाटणा एक्सप्रेस रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातात तब्बल 140हून अधिक निष्पाप बळी गेले. या अपघातामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. काहींचे जीव जरी वाचले असले तरी त्यांनी आपली माणसे या अपघातात गमावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात सापडलेल्या अशाच एका पित्याची ही हृदयद्रावक कहाणी. सत्येंद्र सिंह आपल्या कुटुंबासोबत एका सोहळ्यासाठी म्हणून निघाले होते. मात्र नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. मध्यरात्रीच्या सुमारास अपघाता झाला आणि सत्येंद्र यांची पत्नी आणि मुलगी या अपघातात मरण पावली. 


अर्धा तास सत्येंद्र यांची मुलगी पपा वाचवा कोणी आहे का? प्लीज वाचवा अशा आर्त हाका देत होते. मात्र ट्रेनच्या सीटमध्ये अडकलेले सत्येंद्र काही करु शकले नाहीत. आपल्या मुलीला धीर देण्याचा ते प्रयत्न करत होते मात्र सीटमध्ये दबलेले असल्याने त्यांचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नव्हता. अखेर मुलीने त्यांच्या डोळ्यादेखत तेथेच प्राण सोडले. या अपघातात 140हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 200हून अधिक जण जखमी झालेत. गेल्या 6 वर्षातील सर्वात भीषण असा हा रेल्वे अपघात आहे.