मुंबई : नुकत्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 'इन्फोसिस'मध्ये काम करणारा राघवेंद्रन गणेसन मृत्युमुखी पडला. क्रूर नियतीचा खेळ असा की केवळ महिनाभरापूर्वीच तो पिता बनला होता... पण, आपल्या अपत्याला मोठं होताना पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेसननं कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बेल्जियनमध्ये मेट्रो पकडली. त्याचा शेवटचा संपर्क झाला तो त्याच्या आई-वडिलांशी... 'स्काईप' या अॅप्लिकेशनद्वारे त्यानं हल्ल्याच्या तासाभरापूर्वीच आपल्या घरी संपर्क केला होता.


फेसबुकवर सुखरुप असल्याचं सांगितलं


झावेन्टेम एअरपोर्टवर पहिले दोन स्फोट झाले त्यानंतर गणेसननं आपण सुखरुप असल्याचं फेसबुकवर अपडेटही केलं होतं. परंतु, मिलबिक मेट्रो स्टेशनवर तिसरा बॉम्बस्फोट झाला तेव्हा मात्र गणेसनचा संपर्क तुटला.  


त्यानंतर बेल्जियममध्ये असलेल्या इंडियन अॅम्बॅसीच्या अधिकाऱ्यांनी यांनी गणेसनच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला. डीएनए टेस्ट केल्यानंतर हाती लागलेला मृतदेह गणेसनचाच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.  


अवघ्या 40 दिवसांचं बाळ पदरात


गेल्याच महिन्यात गणेसनच्या पत्नीनं - वैशालीनं एका सुंदर बाळाला जन्म दिलाय. अवघ्या 40 दिवसांचं हे बाळ आणि वैशाली सध्या चेन्नईमध्येच आहेत. तर गणेसनचा छोटा भाऊ आणि पालक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बेल्जियममध्ये दाखल झालेत. मूळचं चेन्नईचं हे कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत वास्तव्यासाठी आहेत.