`इन्फोसिस` कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर
काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती.
चेन्नई : काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपीचा फोटो आज पोलिसांकडून जाहीर करण्यात आलाय.
या फोटोमधील व्यक्तीनं निळ्या रंगाचं शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलीय. हा व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्येही याच रंगाच्या पेहरावात दिसला होता. रविवारी पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जाहीर केलं होतं. हा आरोपी सध्या फरार आहे. या व्यक्तीबद्दल आणखी माहिती मिळालेली नाही.
कोण होती ही तरुणी....
एस स्वाती असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे. ती 'इन्फोसिस'मध्ये काम करत होती. गेल्या शुक्रवारी सकाळी 6.30 वाजल्याच्या सुमारास नन्गाम्बक्कम रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली होती.
रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस यांच्यातील हद्दीच्या वादामुळे स्वातीचा मृतदेह जवळपास अडीच तास रेल्वे स्टेशनवर पडून होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी पहिल्यांदा या घटनेची तक्रार नोंदवली. त्यानंतर हे प्रकरण शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलं.
तपासाला तेजी
या घटनेनं अनेक संवेदनशील व्यक्तींना हादरा दिलाय. नागरिकांत एकच गहजब उडाल्यामुळे पोलिसांवर दबाव आला आणि त्यानंतर आत पोलिसांच्या आठ स्पेशल टीम्स सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.