मुंबई : भारतीय नौसेनेची ताकद आणखी वाढली आहे. फॉलो ऑन वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (FO-WJFAC) श्रेणीचं लढाऊ जहाज आयएनएस तिहायुला बुधवारी ईस्टर्न नेव्हल कमांड प्रमुख एचसीएस बिष्ट यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात शामिल केलं गेलं. पहारा ठेवण्यासाठी, बचाव कार्यामध्ये याचा उपयोग होणार आहे. ईस्टर्न फ्लीटमध्ये सहभागी केलं गेलेलं हे सहावं WJFAC आहे. यापैकी चार चेन्नई, दोन विशाखापट्टनम येथे तैनात करणार येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

315 टन वजनाचं हे जहाज लेटेस्ट 4000-सीरीजच्या एमटीयू इंजनने परिपूर्ण आहे. मॉडर्न मशीनरी कंट्रोल सिस्टम आणि वॉटर जेट्स यामध्ये लावण्यात आले आहेत. 35 नॉट्स म्हणजेत 65 किमी प्रतितासच्या वेगाने हे जहाज समुद्रात धावेल. समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी यामध्ये लेटेस्ट कम्यूनिकेशन सिस्टम आणि रेडार लावले गेले आहे. यामध्ये असलेलं मरीन डीजल इंजन 2720 किलोवॅट पावर तयार करतं. स्वदेशी 30mm गन CRN-91 यामध्ये लावण्यात आली आहे. हल्ल्यावेळी हे प्रभावीपणे काम करणार आहे.


कोलकात्यातील कंपनी गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजीनियर्स लिमिटेडने हे जहाज बनवलं आहे. कंपनीने इंडियन नेव्हीला ३० ऑगस्टला हे जहाज सुपूर्द केले. अंदमानमधील एका द्वीप समुहाचं नाव याला देण्यात आलं आहे.