COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीर :  जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पोलीस आणि लष्कराच्या जवानांना अजब आवाहन केलंय... वेळप्रसंगी आंदोलकांनी मारलेले दगड खा, पण त्यांच्यावर गोळीबार करण्यापासून स्वतःला परावृत्त करा, असं त्यांचं म्हणणं आहे. 


आपण अंगावर झेललेले दगड हा आपला त्याग आहे असं समजा असे तारेही त्यांनी तोडलेत... त्याचबरोबर दहशतवादाकडे वळलेल्या काश्मिरी तरुणांना गोळ्या घालण्याऐवजी त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहनही मुफ्ती यांनी पोलिसांना केलंय... 


काश्मिरी तरुण असलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये आगडोंब उसळला... 


त्या पार्श्वभूमीवर मुफ्ती बोलत आहेत, हे उघड आहे... मात्र स्वतः मुफ्ती यांच्यावर जमावानं दगडफेक केली तर त्या सहन करणारा का आणि त्याकडे त्याग म्हणून बघणार का हा प्रश्न आहे...