नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय. पीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ), किसान विकास पत्र तसेच वरिष्ठ नागरिक, लघु बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याज दरात आज १ एप्रिला २०१६ पासून १.३ टक्के कपात करण्यात येणार आहे. सरकार तिमाही आधारावर दर बदलणार आहे.


१ एप्रिल ते ३० जून दरम्यान, पीएफवर ८.१ टक्के व्याज देण्यात येणार आहे. पहिले हे व्याज ८.७ टक्के होते. तर किसान विकास पत्र या योजनेत ८.७ टक्क्यांवरुन ७.८ टक्के व्याजदर खाली आणण्यात आलाय. तर पाच वर्षांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ९.३ टक्क्यांऐवजी ८.६ टक्के व्याज दर केलाय. लहान मुलींच्या बचत योजना सुकन्या समृद्धी खात्यावर ९.२ वरुन ८.६ टक्के व्याज घाली आणण्यात आलेय.


यापुढे मोदी सरकार प्रत्येक तीन महिण्यावर व्याज दर ठरविणार आहे. मात्र, याआधी हे व्याज वर्षावर आधारित होते. त्यात बदल करण्यात आलाय. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.