जयपूर : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १३९ नंबर डायल करून प्रवाशांना हमाल, टॅक्सी, व्हीलचेयर, पिक अॅण्ड ड्रॉप अशा सेवा मुख्य रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३९ आयवीआर या रेल्वेच्या लोकप्रिय नंबरचा उपयोग प्रवाशांना अनेक सेवा पुरवण्यासाठी करण्याचा निर्णय आयआरसीटीसीचे(IRCTC)अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोचांनी घेतला आहे. या नंबरचा जास्त उपयोग रेल्वे प्रवासी पीएनआर, सीट बुकिंग, भाडे चौकशी आणि जेवनाच्या बुकिंगसाठी करत होते. परंतु आता रेल्वे आरक्षण तिकीट रद्द करण्यासाठी आणि तिकीटांचे पैसे परत मिळवण्यासाठी १३९ नंबरचा वापर करण्याची सेवा रेल्वेने नुकतीच सुरु केली आहे.
 
१३९ नंबर डायल केल्यानंतर पिक अॅण्ड ड्रॉप सेवेत प्रवासी मुख्य रेल्वे स्थानकांवर टॅक्सी भाड्यावर घेऊ शकतात तसेच ठराविक रेल्वे गाड्यामध्ये निश्चित तिकिटधारक प्रवासी प्रवास तिकिटांच्या आधारे या सेवेचा पर्याय निवडू शकतात.


वीजा, मास्टर, डेबिट आणि क्रेडिटचा वापर किंवा रेल्वेच्या आयआरसीटीसी वेबसाईटवर जाऊन या सेवांसाठी बुकिंग करू शकतो. १३९ या नंबरवरून प्रवासी मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू, बंगाली, आसामी आणि उडिसा भाषांमधून बुकिंग करू शकतो.