नवी दिल्ली : इशरत जहाँ एनकाऊंटरप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गृहमंत्रालायातील अधिकारी आरवीएस मणी यांनी याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इशरत जहाँ प्रकरणात एफिडेविड बदलण्यासाठी मला टॉर्चर करण्यात आले होते असा खुलासा त्यांनी केलाय. तसेच माझ्या शरीरावर सिगारेटचे चटकेही दिले होते असा आरोप त्यांनी यावेळी केला. एका मुलाखतीदरम्यान मणी यांनी हा खुलासा केलाय.


इशरत आणि तिचे साथीदार दहशतवादी नव्हते हे दाखवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेले एफिडेविट बदलण्यासही मला सांगण्यात आले होते. एसआयटी प्रमुख सतीश वर्मा यांनी मला खूप टॉर्चर केले. सीबीआय अधिकारी माझ्यावर पाळत ठेवून होते असा आरोपही त्यांनी केलाय.