सर्जिकल स्ट्राईकनंतर आयएसआय प्रमुखाची हकालपट्टी
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे.
इस्लामाबाद : भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे प्रमुख जनरल रिझवान अख्तर यांची हकालपट्टी होणार असल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलं आहे.
रिझवान अख्तर हे आयएसआयचे महासंचालक आहेत. नोव्हेंबर 2014मध्ये त्यांनी महासंचालकपद स्विकारलं होतं. रिझवान शेख यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2017मध्ये संपणार होता, पण सर्जिकल स्ट्राईकमुळेच रिझवान शेख यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.