हैदराबाद : दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असलेल्या आणि ISIS चे समर्थन करणाऱ्या दहा संशयितांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी एनआयएच्या पथकाने हैदराबादमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी १० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना ज्या ठिकाणी अटक केली त्याठिकाणाहून  शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.


हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट या संशयितांकडून रचला जात होता, अशा त्यांच्यावर संशय होता. त्यानंतर गुप्तचर यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशातील विविध ठिकाणांहून इसिस समर्थकांना ताब्यात घेण्यात येत आहे. हैदराबादमध्येही यापूर्वी इसिस समर्थकांना अटक करण्यात आली होती.  


दरम्यान, हैदराबादमध्ये वकिलांच्या आंदोलनामुळे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्फोट घडवण्याची तयारी या पकडलेल्या संशयितांकडून करण्यात येत होती.