श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक गौरवास्पद कामगिरी केली आहे. तब्बल २० उपग्रह अवकाश पाठवून विक्रम केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्त्रोने आज तब्बल २० उपग्रह अवकाशात पाठविलेत. सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटा येथून PSLV - C 34 हे अवकाशयान, 20 उप्रगहांना घेऊन अवकाशात झेपावलेत. 


यामध्येच पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी पाठवला जाणारा कार्टोसॅट टू हा महत्त्वाचा उप्रगह ही असणार आहे. या सर्व उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणासाठी सध्या या अवकाशयानाच्या विविध चाचण्या घेण्यात आल्यात.


या सर्व वीस उपग्रहांचं सुमारे वजन सव्वा हजार किलोपेक्षा अधिक आहे. अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंडोनेशियासहित, दोन भारतीय विद्यापीठांच्या उपग्रहांचाही यात समावेश आहे.