`इन्सॅट-3 डीआर` उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दिशेनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला मोठं यश येणार आहे.
श्रीहरिकोटा : हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दिशेनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला मोठं यश येणार आहे.
कारण आणखी एक महत्वाचा उपग्रह 'इन्सॅट-3 डीआर' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्त्रोकडून करण्यात आले आहे.
इनसॅट थ्री डीआर हा उपग्रह, आज दुपारी चार वाजून १० मिनिटांनी, जीएसटव्ही एफ झिरो फाईव्ह या भूस्थिर यानाच्या मदतीनं अवकाशात सोडण्यात आला.
आंध्रप्रदेशातल्या श्रीहरिकोट्यातल्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये काल सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी याचं काऊंडाऊन सुरू झालं होतं. इनसॅट 3 डीआर हा २ हजार २११ किलोचा उपग्रह असून त्याची कंट्रोल रुम कर्नाटकातल्या हासन शहरात होती.
पृथ्वीपासून ११० किलोमीटर उंचीवर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यासाठी साधारण १७ मिनिटांचा होता, अशी माहिती इस्त्रोनं दिलीय. या उपग्रहाचं आयुष्य १० वर्ष असेल.