नवी दिल्ली : सध्या देशभरात जेएनयू वादावरुन वातावरण चांगलेच तापलेय. यातच जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याने राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या नसण्याची शक्यता गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केलीये. जेएनयू वादाबाबतचा रिपोर्ट सुरक्षा एजंसीने गृहमंत्रायलायकडे सोपवलाय. या रिपोर्टमध्ये कन्हैय्या कुमार याने विद्यापीठात भाषणादरम्या देशविरोधी वक्तव्ये केली नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांनी उत्साहाच्या भरात ही कारवाई करताना कन्हैयाविरोधात देशद्रोहाचे आरोप लावलेत. अफजल गुरुच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या सभेत जी घोषणाबाजी झाली ती डेमोक्रेटिक स्टुंडट युनियनशी संबंधित विद्यार्थ्यांनी केल्याचे सुरक्षा एजंसीचे म्हणणे आहे. या सभेसाठी लावलेले फलकही केवळ 'डीएसयू'च्या नेत्यांच्या नावाने लावले गेल्याची माहिती आहे.


या सभेला दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांचाही पाठिंबा होता. गिलानी सध्या 'कमिटी फॉर रिलीज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स' या संघटनेचे काम पाहतात. त्यांच्यावरही एका वेगळ्या कार्यक्रमासाठी देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत. गिलानी यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे. त्याचप्रमाणे काश्मीर आणि नागालँडमधील फुटीरतावादी विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन त्यांचा एक गट बनवण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती.


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काही दिवसांपूर्वी जेएनयू विद्यापीठातील सभेला लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते.