चंदिगड : हरियाणामधील हिस्सार आणि हंसी येथे पोलिसांनी शुट अॅट साईडटची ऑर्डर दिली आहे. जाट आंदोलनात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाट आरक्षण आंदोलनावरुन चिघळलेलं वातावरण अजून चिघळत चाललं आहे. 


ज्या ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे त्या ठिकाणी फ्लॅग मार्च सुरु आहेत, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असा विश्वास डीजीपी य़शपाल सिंघल यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुन्हा नव्याने लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.


कर्फ्यू लावलेला असतानादेखील अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी जिंद जिल्ह्यातील रेल्वे कार्यालय जाळलं तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही रोखून धरली होती. पोलिसांसोबत खाजगी वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. 


पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात १२९ गुन्हे दाखल केले आहेत.
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने शनिवारी कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या ठिकाणी फ्लॅग मार्चदेखील काढला होता. रोहतकला जाणारे सर्व मार्ग बंद असल्याने लष्कराला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली.