चेन्नई : तामिळनाडूत प्रसिध्द असणा-या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आज चेन्नईतली सर्व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने सर्वांना शांततेचं आवाहन केले आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची या विषयावर भेट घेण्याची शक्यता आहे. चेन्नईतल्या मरिना बीचवर नागरिकांनी तुफान गर्दी  करत जलाईकट्टूला आपला पाठिंबा दर्शवला आहे.


पोंगलच्यावेळी खेळल्या जाणाऱ्या खेळावर 2014मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या बंदिविरोधात अनेक याचिका न्यायलयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं तात्काळ निर्णय देण्यास नकार दर्शवला होता.



तरीही यावर्षी जलाईकट्टूचं थोडयाफार प्रमाणात आयोजन करण्यात आले. मात्र यावर तोडगा निघत नसल्याने आता जनता रस्त्यावर उतरून एक प्रकारे आंदोलन करत आहे.