नवी दिल्ली : जल्लीकट्टूशी संबंधित अध्यादेशावर आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री पनीरसेल्वम रविवारी सकाळी 10 वाजता जल्लीकट्टूच्या आयोजनाचं उद्घाटन करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अध्यादेशावर केंद्राच्या मंजुरीनंतर आता राष्ट्रपतींची मंजुरी गरजेची आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार, आता या अध्यादेशाऐवजी एक बिल आणण्यात येणार आहे. 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राज्याच्या विधानसभेत हे बिल मांडण्यात येईल. या बिलला सदनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.   


खेळावर लावण्यात आलेल्या या बॅनविरोधात चेन्नईच्या मरीना बीचवर जवळपास दोन लाखांहून अधिक लोक अजूनही जमा झालेले दिसत आहेत. अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिनंदेखील जल्लीकट्टूचं समर्थन केलंय. 


उल्लेखनीय म्हणजे, सर्वोच्च न्यायालयानं जल्लीकट्टूवर बंदी आणली होती... त्यानंतर हा मुद्दा तमिळनाडूच्या अस्मितेचा प्रश्न बनलाय.