जम्मू-काश्मीर :  पुंछ जिल्ह्यात दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झालेत. या हल्ल्यांत तीन दहशतवादी ठार झालेत तर एक पोलीस शिपाई शहीद झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन-तीन दहशतवादी पुंछ भागातील मिनी सचिवालयात घुसल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली. सकाळी आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी या भागात हल्ला केला.. यात एक पोलीस शिपाई संदीप कुमार शहीद झालेत. तर पोलीस उपनिरीक्षक मंजुर अहमद हे जखमी झालेत.


दुसरीकडे  हंदवाडामधील नौगाम सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणू पाडला... या कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आलंय... या दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय... या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी लष्कर ए तोयबानं घेतलीये..