जम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली
जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय.
जम्मू काश्मीर : जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय.
रविवारी संध्याकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ४ सप्टेबरला सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मिरला भेट देणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंहदेखील या शिष्टमंडळात असणार आहेत. मात्र संचारबंदी उठवल्यानंतरदेखील फुटीरतावाद्यांनी आंदोलनं सुरूच ठेवलीयत.
सर्व प्रमुख फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. काश्मिर खोऱ्यात झालेल्या दंग्यांमध्ये आजवर ६८ नागरिक आणि ३ पोलिसांना आपला जीव गमवावा लागलाय. तर ११ हजारपेक्षा अधिक नागरिक यात जखमी झालेत.