श्रीनगर : जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांनी फुटीरतावादी नेते सैयद अली गिलानी, मीरवाइज उमर फारुक आणि मोहम्मद यासीन मलिक यांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिनही फुटीरतावादी नेत्यांना विरोध प्रदर्शन आणि परवानगी न घेता पत्रकार परिषद घेतल्याने अटक करण्यात आली आहे.


फुटीरतावादी नेत्यांना पोलिसांनी जम्मू कश्मीरमध्ये वातावरण बिघडवण्याचं कारणास्तव अटक केली आहे. तिनही नेत्यांना बडगामच्या हम्मामा पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.