जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. 9.2 किलोमीटर लांब चनैनी-नाशरी बोगदा जम्मूच्या उधमपूरमध्ये बनवला गेलाय.


2500 कोटी रुपयांच्या खर्चातून हा बोगदा तयार करण्यात आलाय. या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील 31 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. बर्फवृष्टीमुळे तुटणारा संपर्कही या बोगद्यामुळे सुटणार आहे.