काश्मीरमधील शहीद जवानांचा आकडा १८ वर
उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत.
श्रीनगर : उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत. यवतमाळचे विकास जनार्दन कुळमेथे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बारामुल्ला जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला झाला.
महाराष्ट्राच्या तीन वीर जवानांचा यात समावेश आहे. लान्स नायक जी शंकर साताऱ्याच्या जाशी गावचे, तर टी. एस. सोमनाथ नाशिकच्या खंडनगळीचे, यूके जानराव अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.
व्यर्थ न हो बलिदान ; उरी हल्ल्यातील शहीद जवान
१) सुभेदार कर्नल सिंग - जम्मू काश्मीर
२) हवालदार रवी पॉल - जम्मू काश्मीर
३) शिपाई राकेश सिंग - बिहार
४) शिपाई जावरा मुंडा - झारखंड
५) शिपाई नैमन कुजूर - झारखंड
६) शिपाई उईके - अमरावती, महाराष्ट्र
७) हवालदार एन. एस. रावत - राजस्थान
८) शिपाई गणेश शंकर - उत्तर प्रदेश
९) नायक एसके विद्यार्थी - बिहार)
१०) शिपाई बिस्वजीत घोराई - पश्चिम बंगाल
११) लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे - जाशी, सातारा
१२) शिपाई जी दलाई - पश्चिम बंगाल)
८३) लान्स नायक आर के यादव - उत्तर प्रदेश
१४) शिपाई हरिंदर यादव - उत्तर प्रदेश)
१५) शिपाई संदीप सोमनाथ ठोक - खंडनगळी, नाशिक
१६) हवालदार अशोक कुमार सिंग - बिहार
१७) शिपाई राजेश सिंग - उत्तर प्रदेश)
१८) विकास जनार्दन कुळमेथे