मुंबई : शहिद जवानाची मुलगी गुरमेहर कौरला पाठिंबा देताना जावेद अख्तर यांनी सेहवागवर टीका केली होती. सेहवागवर केलेली टीका जावेद अख्तर यांनी आता मागे घेतली आहे. सेहवाग हा निसंशय एक सर्वोत्तम खेळाडू आहे. गुरमेहरबद्दल केलेलं ट्विट ही एक थट्टा होती, असं सेहवाग म्हणाला आहे. त्यामुळे मी त्याच्याबद्दल वापरलेले कठोर शब्द मागे घेतो, असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्ताननं नाही तर युद्धानं माझ्या वडिलांना मारलं असं सांगणारा गुरमेहरचा एक जुना फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. यानंतर मी त्रिशतक झळकावलं नाही तर माझ्या बॅटनं त्रिशतक झळकावलं असं ट्विट सेहवागनं केलं होतं.


सेहवागच्या या ट्विटनं मोठा गदारोळ झाला. याला जावेद अख्तर यांनीही प्रत्युत्तर दिलं. एखादा अशिक्षित खेळाडू शहिदाच्या मुलीला ट्रोल करत असेल तर समजू शकतो, पण सुशिक्षित माणसांना काय झालं आहे, असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं होतं.