नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी राज्यसभेत जांभळ्या रंगाचं जॅकेट घालून येण्याची धमकी दिली आहे. राज्यसभेत सध्या उत्तराखंडच्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष आणि विरोधकांमध्ये गदारोळ सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या तीन सत्रांपासून मी महिला कल्याणावर बोलण्याची मागणी करत आहे, मात्र मला कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. उद्या मी जांभळ्या रंगाचा जॅकेट घालणार आहे जेणेकरुन तुम्ही माझ्या उपस्थितीची नोंद घ्याल. तुम्ही आमच्याकडे लक्षच देत नाही. तुम्ही आमचं ऐकत नाही कारण तुम्ही काँग्रेसचे नवे नेते सिताराम येचुरी यांच्याशी बोलण्यात व्यस्त असता', असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.


राज्यसभा उपाध्यक्ष पी जे कुरियन सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जया बच्चन यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. 'तुम्ही सिताराम येचूरी यांच्याशी बोलण्यात व्यस्त आहात, आमचं ही ऐका. इतर पक्षांसोबत हा अन्याय आहे. इतर पक्षाचे लोकं जोराने बोलत नाहीत, ओरडत नाहीत आणि सभागृहाच्या कामात अडथळा आणत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं', जया बच्चन यांनी म्हटलं आहे.


'गेल्या तीन सत्रांपासून जया बच्चन या महिला कल्याणावर बोलण्याची मागणी करत आहेत. मात्र त्यावर कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:ची उपस्थिती नोदंवण्यासाठी जांभळ्या रंगाचं जॅकेट घालणार असल्याचं सांगितलं आहे.