इंफाळ : गेल्या सोळा वर्षांपासून मणिपूरमध्ये लागू असणाऱ्या अस्फाविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला आज आपलं उपोषण संपवणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

44 वर्षीय इरोम शर्मिला यांना गेली सोळा वर्ष नाकातून अन्न दिलं जातं. त्यांच्यासाठी तुरुंगात एक छोटं रुग्णालय तयार करण्यात आलंय. आज मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये आज इरोम शर्मिला एका कोर्टात आपलं उपोषण सोडतील. 


त्यानंतर त्यांना तुरुंगातूनही मुक्त करण्यात येणार आहे. बाहेर आल्यावर त्यांना तातडीनं पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात येईल. येत्या काळात शर्मिला राजकारण उतरणार असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलंय.