नवी दिल्ली : काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगरच्या, बडगाम, गांदरबल, बांदीपोरा, बारामुल्ला या भागांतून ही संचारबंदी उठवण्यात आलीय. परंतु, दक्षिण कश्मीरमध्ये कर्फ्यु अजूनही लागू आहे. खोऱ्यात १४४ कलम अजूनही लागू आहे. 


कारवा-ए-अमन म्हणून ओळखली जाणारी काश्मिर-मुजफ्फराबाद बससेवादेखील सोमवारपासून सुरू करण्यात आलीय. गेल्या दोन आठवड्यांपासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. काश्मिरमध्ये १८ दिवसांपासून बंद असलेली मोबाईल सेवादेखील सुरू झालीय. 


हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी लष्करासोबत झालेल्या चकमकीत ८ जुलैला मारला गेला. त्यानंतर काश्मीर अशांत आहे. काश्मिरमध्ये कुठलाही मोर्चा किंवा आंदोलन होणार नाही, याची पोलीस काळजी घेतायत. 


काश्मिरमध्ये झालेल्या दंग्यात आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झालाय, तर सुमारे ३४०० नागरिक जखमी झालेत.