पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
उरी हल्ल्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.
श्रीनगर : उरी हल्ल्याला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.
एकीकडे भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना जम्मू-काश्मीरच्या कुलगाम नंतर आता अखनूर भागात पाकिस्तानी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पहाटे 4 वाजल्यापासून गोळीबार सुरू आहे.तसेच तोफगोळ्यांचाही मारा करण्यात आला.
गोळीबाराला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येतय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी तळ उद्धस्त करण्यापूर्वीच घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हे कृत्य असावं, अशी शक्यता आहे.