नवी दिल्ली : आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवू नये.  देशप्रेम माझ्या रक्तात, माझ्या हृदयात आहे. माझ्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलेय, असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी  भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज काँग्रेसच्या शिष्टमंडळासह त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. जवाहरलाल नेहरु विद्यापाठीतील घडामोडींवरुन सुरु असलेल्या वादप्रकरणी त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. जर कोणी आपल्या देशाचा अपमान करत असेल तर, त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे, पण त्यासाठी संपूर्ण विद्यापीठाला बदनाम करणे योग्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.


 


राष्ट्रीय स्वंयसेवक संघ त्यांची विचारसरणी विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही तसे होऊ देणार नाही. विद्यार्थ्यांच्या कल्पनांमुळे आज देशाची उन्नती झाली आहे. त्यांच्यावर विचारसरणी लादण्याचा देशाला फायदा होणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. 


दरम्यान, पत्रकारांना सर्वांसमक्ष मारहाण होते आणि पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. यामुळे संपूर्ण जगभरात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे, असे ते म्हणालते. राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना बोचरा सवाल केला.