नवी दिल्ली : देशद्रोहाचा आरोप असलेला उमर खालिद अखेर दिल्ली पोलिसांना शरण आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेएनयूमधून काल रात्री बारा वाजण्याच्या सुमाराला उमर खालिद आणि त्याचा आणखी एक साथीदार अनिर्बन भट्टाचार्य दिल्लीतल्या वसंत कुंज पोलीस ठाण्यात हजर झाले. तिथून पोलिसांनी त्याला अज्ञात स्थळी नेलं. 


दरम्यान देशद्रोहाचा आरोप असलेले इतर तीनजण अजूनही जेएनयूमध्येच आहेत. राम नागा, आशुतोष आणि अनंत प्रकाश अशी त्यांची नावं आहेत.