जोधपूर : अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खानला दिलासा मिळालाय. जोधपूर कोर्टाने याप्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानविरोधीतल चार खटल्यामधील तीनमध्ये सलमानची निर्दोष मुक्तता झालीये. सलमान आज बहिण अलविरासह जोधपूर कोर्टात उपस्थित होता. 


1998 साली सलमान खाननं एका चिकांरा जातीच्या हरणाची आणि दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये खटला दाखल करण्यात आला. तेव्हापासून सलमान खानवर एकूण चार खटले सुरू होते. त्यापैकी चिंकारा जातीच्या हरिणाची शिकार केल्याप्रकरणी दाखल दोन खटल्यांमध्ये सलमानची राजस्थान हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. तिसरा दोन काळवीटांच्या शिकारीचा खटला अजूनही सुरू आहे. तर चौथ्या अवैधरित्या शस्त्र बाळगल्याच्या खटल्यावर आज जोधपूरमध्ये सुनावणी झाली. 


या खटल्यात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 3 अंतर्गत 25 आणि 27व्या तरतूदीनुसार जंगलात मुदत संपलेला परवान्याच्या आधारे शस्त्र बाळगल्याचा सलमानवर आरोप आहे. याप्रकरणी 9 जानेवारीला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर आज  न्यायाधीश दलपतसिंह राजपुरोहित यांनी निकाल देत सलमानची निर्दोष मुक्तता केली.