नवी दिल्ली :  पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला नकार देत पाकिस्तानने पुरावे मागितले आहेत. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना कडक शब्दात प्रत्यूत्तर दिलं आहे. राजनाथ सिंह बोलले की, 'वाट पाहा आणि बघा'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, आमच्या जवानांचा पराक्रम जगभराने पाहिला आणि ज्याप्रकारे जवानांनी कामगिरी यशस्वी केली त्यावर आम्हाला अभिमान आहे.


पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी काही व्हिडिओ दाखवले आहे. ज्यामधून काहीतरी खोटं पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. एलओसीवर भारतीय सेनेचा बंकर पाकिस्तानने उद्धवस्त केला असं या या व्हिडिओमधून दाखवण्यात येत आहे. सर्जिकल स्ट्राइक झालंच नसल्याची पाकिस्तानने म्हटलं आहे. इंडियन आर्मीने हा व्हिडिओ खोटा असल्याचं सांगितलं आहे.