नवी दिल्ली : श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी आणि पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. पाक सरकारविरोधातही मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनगरमध्ये वातावरण सध्या तापलेलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या कोटील भागात पाक लष्करानं बळजबरीने जमिनीवर कब्जा केलाय. त्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. सकाळीच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काश्मीर खो-यातल्या वाढत्या हिंसाचाराबाबत चर्चा झाल्याचं समजतंय.