केजरीवाल यांनी जाहीर माफी मागावी - शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी वादावरून राजधानी दिल्लीचं राजकारण तापलंय. अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर केलेले पदवीसंदर्भातले आरोप दुर्दैवी आणि खोटे असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी वादावरून राजधानी दिल्लीचं राजकारण तापलंय. अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर केलेले पदवीसंदर्भातले आरोप दुर्दैवी आणि खोटे असल्याचा दावा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केले आहेत.
शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींची पदवी माध्यमांना दाखवली. यावेळी केजरीवाल यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही शाह यांनी केलीय.
तर केजरीवाल यांच्या आरोपांची पातळी खालच्या स्तराची आहे अशी टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.