नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळची तुलना चाचेगिरी आणि गुन्हेगारीचे केंद्र असलेल्या सोमालियाशी केली. यावरून त्यांना केरळी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवरील टॉप ट्रेंड्समध्ये 'पो मोने मोदी' ( #PoMoneModi ) हा टॅग टेन्डमध्ये होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली.  मोदींच्या वक्तव्याबद्दल हा टॅग वापरून 35 हजारांहून अधिक लोकांनी ट्विट केले आहे. 


एका मल्याळम चित्रपटातील 'पो मोने दिनेशा' हे गाजलेलं वाक्य आहे. या डायलॉगवरून चिडलेल्या मल्याळम नागरिकांनी मोदींना टार्गेट केले आहे . या वाक्याचा अर्थ 'बाळ, तू तर कामातून गेलास, सरळ घरी जा' असा आहे. 


केरळमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून 'स्टार कँपेनर' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण करून त्यांचा प्रचाराच्या आघाडीवर मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेण्यात येत आहे. मात्र, एका प्रचारसभेत बोलताना मोदींनी भावनावेगात केरळची तुलना थेट सोमालियाशी केली. हे त्यांना चांगलेच भोवले. 


खरं तर केरळची ओळख ही 'गॉड्स ओन कंट्री' अशी आहे. केरळ हे संपूर्ण साक्षर असलेलं राज्य आहे.