केरळ मंदिर दुर्घटना : पीडिताच्या शरीरातून काढले काँक्रीटचे अर्धा किलो तुकडे
कोल्लम येथील पुत्तिंगल मंदिरातील फटाक्यांच्या भंडाराला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. यात अनेक जण जखमी झालेत. यापैकी एका ३५ वर्षीय युवकाच्या शरिरातून चक्क सिमेंट काँक्रीटचे अर्धा किलो दगड आणि तुकडे काढण्यात आलेत.
तिरुवनंतपूरम : कोल्लम येथील पुत्तिंगल मंदिरातील फटाक्यांच्या भंडाराला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. यात अनेक जण जखमी झालेत. यापैकी एका ३५ वर्षीय युवकाच्या शरिरातून चक्क सिमेंट काँक्रीटचे अर्धा किलो दगड आणि तुकडे काढण्यात आलेत.
डॉ. मोहम्मद नजीर आणि डॉ. मदन मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने पीडिताच्या शरीरातून चक्क अर्धा किलोचे सिमेंटचे तुकडे काढलेत. यावेळी तरुणाच्या शरीरावर शस्त्रक्रिया केल्यात. दरम्यान, या युवकाची प्रकृती अजूनही नाजूक आहेत.
त्याच्या डोक्यात टाके टाकण्यात आले असून मेंदूला मोठ्या जखमा झाल्यात. जरी ऑपरेशन यशस्वी झाले असले तरी या २२ वर्षीय युवकाची प्रकृती अधिक नाजूक आहे. त्याला वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.