श्रीनगर : भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला आहे. पाकिस्तानी सैन्याचा बदला घेतला. रॉकेट लाँचर्स, रणगाडेभेदी क्षेपणास्त्रांचा मारा करून पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स उद्ध्वस्त केलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा पुरावा म्हणून २२ सेकंदांचा व्हिडीओच जगापुढे आणला आहे. या धडाकेबाज कारवाईत पाकिस्तानी जवान आणि दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. लष्कराने थेट पाकिस्तानी सैन्यांच्या चौक्यांनाच टार्गेट केले. पक्के बांधकाम केलेल्या पाकिस्तानी चौक्या आणि बंकर्स पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. रॉकेट लाँचर्स, तोफाभेदी क्षेपणास्त्र ग्रेनाईड लाँचर्सने तुफानी मारा करण्यात आला.



गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गावांना टार्गेट केले जात आहे. सीमा भागातील शेकडो लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे. गेल्या आठवडय़ात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले.


१ मे रोजी कृष्णाघाटी सेक्टरमध्ये मोठी घटना घडली. बीएसएफचे जवान नायब सुभेदार परमजित सिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेमसागर हे दोघे शहीद झाले. पाक सैन्याने या शहीद जवानांच्या मृतदेहांची विटंबना करीत शिरच्छेद केला. या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली. पाकला धडा शिकवा, बदला घ्या, अशी जोरदार मागणी देशभरातून होत होती. a