पूंछ : पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछमधील केजी सेक्टरमध्ये गोळीबार केला यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झालेत. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली होती.


सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल ९९वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेय. १ नोव्हेंबरला पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमेलगत राहणाऱ्या वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. यात आठ नागरिक ठार झाले तर २२ जण जखमी झाले.


पाकिस्तानने केलेल्या गोळीबार तसेच तोफगोळ्यांच्या माऱ्यात एकूण १८ जण ठाक झाले असून यात १२ नागरिकांचा समावेश आहे, तर ८३हून अधिक जण जखमी झालेत.