फ्लाय ओव्हर ब्रिज दुर्घटना : कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक
फ्लायओव्हर ब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झालाय तर ६० हून अधिक जखमी झालेत. या प्रकरणी फ्लायओव्हर बनवणा-या IVRCL या कंपनीच्या पाच अधिका-यांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली.
कोलकाता : येथे फ्लायओव्हर ब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४ जणांचा मृत्यू झालाय तर ६० हून अधिक जखमी झालेत. या प्रकरणी फ्लायओव्हर बनवणा-या IVRCL या कंपनीच्या पाच अधिका-यांना पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली.
गुरुवारी गिरीश पार्क परिसरात हा निर्माणाधीन पूल कोसळला होता.. त्यानंतर ढिगारा उपसण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय... या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी कोलकाता पोलिसांचं ५ सदस्यीय पथक हैदराबादमध्ये दाखल झालंय.
हैदराबादमध्ये हे पथक कोलकात्यातील फ्लायओव्हर बनवणा-या IVRCL या कंपनीच्या अधिका-यांची चौकशी करणार आहे. दुसरीकडे हा एक केवळ अपघात असून यांत कंपनीची चूक नसल्याचं IVRCL कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. ही दुर्घटना म्हणजे एक्ट ऑफ गॉड असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र हा केवळ शब्दप्रयोग असल्याची सारवासारव आता कंपनीकडून करण्यात येतेय.
या दुर्घटनेमागे अन्य काही कारणं असू शकतात असंही कंपनीनं म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी कलकत्ता हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलीय.