नवी दिल्ली : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून पुन्हा एकदा भाषण केलं. नोटाबंदीनंतर 50 दिवस उलटून गेल्यानंतर केलेल्या या भाषणात पंतप्रधान काही नव्या आणि ठोस घोषणा करतील, अशी आशा सामान्य नागरिकांना होती... मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलेल्या इतर काही घोषणांनी नागरिकांचं समाधान मात्र झालेलं नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशानं प्रमाणिक लोकांना गुडघे टेकवण्याशिवाय पर्याय ठेवला नव्हता... हतबलतेमुळे लोकही त्याचा स्वीकार करत होते. परंतु, नोटाबंदीनंतर भारतीयांनी केलेला त्याग येणाऱ्या अनेक वर्षासाठी दिशादर्शक ठरेल, असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलंय. 


लोकांना त्यांचाच पैसा काढण्यासाठी रांगेत उभ रहावं लागलं, मला याविषयी अनेक पत्र आली... त्यात अनेकांनी आपला त्रास व्यक्तही केला आहे. परंतु,  भ्रष्टाचार, काळापैसा, बनावट नोटांच्या लढाईत लोक सोबत आले... परंतु, सरकार - जनता खांद्याला खांदा लावून लढत आहेत... 'कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी' या ओळी प्रमाणे लोक जगले... प्रमाणिकपणा आणि चांगुलपणा किती महत्त्वाचा आहे, उत्तम शिस्त काय असते हे यातून दिसून आलं असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलंय. 


1962, 1965, 1971 आणि कारगिल युद्धात लोकांच्या देशभक्तीचं दर्शन झालं होतं... त्यानंतर आताही ते पाहायला मिळालं... बाहेरच्या शक्तीसमोर देशवासिय एकत्र येतात परंतु आपल्याच देशांतील विकृती विरोधात एकत्र येतात तेव्हा नवीन पद्धतीने विचार करायला ते भाग पाडतात... दिवाळीनंतर लोकांनी त्यागाची पराकाष्ठा केली, असं म्हणत उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणाऱ्या देशवासियांचे मोदींनी आभार मानले. 


तंत्रज्ञानामुळे बेईमान लोकांना मुख्य प्रवाहात यावंच लागेल


- नवीन वर्षात बँकाना सामान्य स्थितीत आणता यावे


- सरकारी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत


- ग्रामीण, दुर्गम भागांतील अडचणी दूर करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत


- भारताने जे केले आहे असं जगात कुठेच झालं नाही


- १ हजार आणि ५०० नोट समांतर अर्थव्यवस्थेप्रमाणे चालले होते


- हेच नोट महागाई, काळा बाजार वाढवत होते


- लोकांचा अधिकार हिसकावून घेत होते


- रोख रक्कमेचा अभाव त्रासदायक आहे परंतु रोख रक्कमे प्रभाव अधिक त्रासदायक आहे


- रोख रक्कमे अर्थव्यवस्थेतून बाहेर पडली तर आक्षेप असतो परंतु अर्थव्यवस्थेत आली तर विकास होतो


- लालबहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, कामराजजी असते तर देशवासियांना नक्कीच आशिर्वाद दिला असता


- आकडेवारीनुसार, देशात केवळ २४ लाख लोक मान्य करतात की १० लाखापेक्षा जास्त कमाई आहे


- प्रमाणिकपणाचे आंदोलनाला अधिक ताकद देणे गरजेचे आहे


- अप्रमाणिक लोकांना काय शिक्षा देणार


- कायदा कठोर काम करेल


- प्रमाणिक लोकांना सुरक्षा कसे मिळेल, मदत कशी मिळेल, हे सरकार पाहणार


- सज्जनांची सरकार मित्र आहे आणि दुर्जनांना योग्य रस्त्यावर आणणार


- लोकांना लालफितीचा कटू अनुभव येत असेल


- नागरिकांची जबाबदारी सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची आहे


- सामान्यांच्या अधाकाराचे संरक्षण केले पाहीजे


- दहशतवाद, नक्षलवाद, बनावट नोट, तस्करी, मानवी तस्करी हे काळा पैशावर अवलंबून असते


- समाजात रोग पसरवत आहेत- बेईमान लोकांसाठी मार्ग बंद झाले आहेत.


- तंत्रज्ञानामुळे बेईमान लोकांना मुख्य प्रवाहात यावंच लागेल


- बँक कर्मचारी, महिला कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे


- काही बॅंकेत लोकांचे गंभीर गुन्हे केले आहेत


- फायदा उचलण्याचा निर्लज्ज प्रयत्न केला आहे


- त्यांना माफ केले जाणार नाही


- सर्व बँकांना आग्रहाने सांगतो की, बँकांकडे एवढ्या कमी वेळेत ऐवढे पैसे कधीच आले नव्हते


- बँकानी गरीब, मध्यम वर्गाला केंद्रबिंदू मानून काम करावं


- गरीब कल्याण वर्ष साजरा केला जात आहे. ही संधी बॅकांनी घालवू नये... लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी पावले उचलावे... तात्कालिक आणि दूरगामीही फळं मिळतील


- गरीब, शेतकरी, दलित, पीडीत, शोषित, वंचित , महिला जेवढे सशक्त होतील तेवढा देश मजबूत बनेल होईल आणि विकास होईल


- 'सबका साथ सबका विकास'नुसार नवीन योजना आणल्या जात आहेत